गावडेआंबेरे सातपऱ्यावरील नव्या पुलाचे काम पूर्णत्वाकडे

पावस : गेल्या दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर गावडेआंबेरे सातपऱ्यावरील पुलाच्या संरक्षक कठड्याचे काम सुरु केल्याने या वर्षांमध्ये पूल वाहतुकीस खुला होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

स्थानिक ग्रामस्थीच्या मागणीनुसार, तीन वर्षांपूर्वी बुडित क्षेत्र कार्यक्रमांतर्गत आठ कोटींचा निधी या पुलाच्या बांधकामासाठी मंजूर करण्यात आला, बांधकामाला सुरुवात करण्यात आली; परंतु पावसाळ्यापूर्वी अर्धवट स्थितीमध्ये ठेकेदाराने काम सोडल्यामुळे दोन वर्षांत कोणतेही काम झाले नाही. गेल्या वर्षी पुलाच्या दोन्ही बाजूंच्या भरावाचे काम हाती घेण्यात आले.

त्यातील गावडेआंबेरे भागातील भरावाचे काम पूर्णत्वास गेले; परंतु नातुंडे भागातील भरावाचे काम जूनमध्ये अर्धवट स्थितीमध्ये झाले, त्यामुळे रस्ता वाहतुकीला सुरू होईल, अशी आशा निर्माण झाली होती; परंतु नातुंडे भागातील भरावाचे काम अर्धवट स्थितीत झाल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी खुला होऊ शकला नाही. गेली दोन वर्षे मुख्य पुलाच्या संरक्षक कठड्यांचे व भरावाच्या बाजूचे बांधकाम झाले नव्हते; मात्र आता पाऊस कमी झाल्यानंतर या मुख्य पुलाच्या संरक्षक कठड्यांचे व भरावाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे यावर्षी सातपऱ्या पूल वाहतुकीस लवकरच खुला होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:04 PM 02/Oct/2024