रत्नागिरी : वयोश्री योजनेचा जिल्ह्यातील १९ हजार ९०५ ज्येष्ठांना लाभ

रत्नागिरी : राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक असलेली साहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता राज्य सरकारने वयोश्री योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी आतापर्यंत १९ हजार ९०५ लाभार्थी पात्र ठरले आहेत.

राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्य, शारीरिक दुर्बलता यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनःस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र आदीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी एकवेळ एकरकमी ३ हजार रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचतखात्यात थेट वितरित केले जातात, या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या या रकमेतून पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थतता, दुर्बलतेनुसार व्हीलचेअर, चष्मा, काठी आदी साहाय्यभूत साधने, उपकरणे खरेदी काता येतात. ज्या व्यक्तीचे वय ६५ वर्षे आणि त्याहून अधिक आहे आणि त्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न २ लाख रुपयांच्या आत आहे, अशा व्यक्त या योजनेचा लाभ दिला जातो. लाभार्थ्यांची तपासणी, प्रवास, अल्पोपहार, कार्यालयीन खर्च, पात्र लाभार्थ्यांची नोंदणी, दस्तऐवज हाताळणी, कागदपत्र तपासणी करून त्यांना डीबीटी प्रणालीद्वारे थेट लाभ वितरित केला जातो. या योजनेची अंमलबजावणी सामाजिक न्याय विभागातर्फे करण्यात येते. ही योजना ६ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू झाली आहे. आतापर्यंत रत्नागिरी जिल्हातील ६५ वर्षांवरील २१ हजार १४९ ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज केले. त्यापैकी १९ हजार ९५४ जणांचे अधिकृत आधार संलग्न असून या योजनेसाठी १९ हजार ९०५ पात्र ठरले आहेत. यापैकी आतापर्यंत ८ हजारपेक्षा अधिक ज्येष्ठांनी या योजनेतर्गत साधनांसाठी एकरकमी लाभ पैकी आहे.

शासनातर्फे १०० टक्के अर्थसाहाय्य
केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोदणीकृत तसेच राज्यशासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेले योगोपचार केंद्र, मनःस्वास्थ्य केंद्र, मनःशक्ती केंद्र प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येते. यासाठी राज्यशासनातर्फे १०० टक्के अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्यात येते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
5:43 PM 06/Feb/2025