गुहागर : Guhagar गुहागर शहरातील श्री वराती देवीचा शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 ते 7 ऑक्टोबर 2024 पर्यंत श्री वराती मंदिर खालचा पाट येथे साजरा होणार असून यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये नित्य कार्यक्रम म्हणून सकाळी सात वाजता श्री वराती देवीची षोडशोपारे येतात पूजा, सायंकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी देवीची आरती व प्रसाद असे कार्यक्रम असणार आहे. तसेच दररोज कर्तबगार मातेचा राजमाता जिजाऊ सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये ज्योती अशोक देवकर, निर्मला लक्ष्मण जैतापकर, मनीषा मंगेश कदम, शुभदा सुभाष नार्वेकर यांचा सन्मान करण्यात येणार आहे. गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता देवीची सहस्त्रनामावली, सायंकाळी पाच वाजता दुर्गा श्री भजन मंडळ वरचा पाट यांचे भजन, रात्र आठ वाजता कांचन स्वामी नृत्य कलापथक असगोली हुंबरवाडी यांचे जाखडी नृत्य, रात्र दहा वाजता स्वयंप्रकाश गोय थळे खालचापाट यांचे भजन, शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता कुंकू मार्जन, सायंकाळी चार ते पाच तीस वाजता कलावती आई भजन, रात्र आठ वाजता स्वर साधना भजन महिला मंडळ ज्ञानेश्वर यांचे भजन, रात्र दहा वाजता जय बजरंग प्रासादिक भजन मंडळ पिंपळ यांचे भजन, शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता सप्तशती पाठ वाचन, रात्र आठ वाजता कीर्तने नृत्यकला पथक कीर्तन वाडी यांचे जाखडी नृत्य, रात्र दहा वाजता नूतन गोपाळकृष्ण भजन मंडळ जांभळेवाडी यांचे भजन, रविवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ तीस वाजता कुमारी का पूजन, रात्र आठ वाजता माऊली वरदान देवी कलापथक रानवी यांचे जागरण नृत्य, रात्र दहा वाजता श्री दत्त प्रसादिक भजन मंडळ वरचा पाट यांचे भजन, सोमवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता श्री चंडी हवन, रात्र आठ वाजता श्री वराती देवीचा महाप्रसाद, रात्रो दहा वाजता श्रीदत्त प्रसादिक भजन मंडळ पालशेत यांचे भजन, रात्रो अकरा वाजता गंगामाता प्रासादिक भजन मंडळ कोंडकारूळ यांचे भजन असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आव्हान नितीन गोयथळे व अजित मोरे या मानकरांनी केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:30 PM 02/Oct/2024