रत्नागिरी : जिल्ह्यात श्रमदानातून २ हजार ९४१ बंधारे

रत्नागिरी : पाणी अडवा, पाणी जिरवा, या संकल्पनेतून जिल्हा परिषद कृषी विभागातर्फे दरवर्षी श्रमदानातून बंधारे उभारले जातात. जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ९४१ बंधारे बांधण्यात आले आहेत. या मोहिमेत ग्रामस्थांचाही सहभाग वाढला आहे. विधानसभा निवडणुकीमुळे विलंबाने सुरू झालेल्या या मोहिमेमुळे एप्रिल, मे या उन्हाळ्याच्या कालावधीत पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही.

उशिरापर्यंत पडलेला पाऊस आणि बंधाऱ्याचे लांबलेले काम यामुळे जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईही लांबण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गावातून वाहणारे नाले, वहाळ आणि उपनद्या यावर तात्पुरते बंधारे बांधून त्या पाण्याचा उपयोग करण्यात येत आहे. श्रमदानातून हे बंधारे उभारले जात आहेत. एप्रिल-मे महिन्यात कडाक्याच्या उन्हात पाणीपातळी कमी तर काही ठिकाणी विहिरी पूर्णतः कोरड्या होतात. त्या वेळी पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. बंधाऱ्यातील पाण्यामुळे अनेक विहिरीचे पाणी उशिरापर्यंत वापरण्यास मिळत आहे. काही गावांमध्ये कच्चे बंधारे, विहिरी यामुळे पाणीपातळी वाढवण्याच्या उद्देशाने उभारले जातात. गेल्या दोन वर्षांत गावागावात पाणीयोजनांची कामे हाती घेण्यात आली आहेत.

जिल्ह्यातील बंधाऱ्यांची स्थिती
मंडणगड २२३, दापोली-६८०, खेड ८२, गुहागर-२१४, चिपळूण-५२८, संगमेश्वर-४९४, रत्नागिरी-३५२, लांजा २२३, राजापूर-१४५, एकूण २ हजार ९४१ बंधारे आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:44 PM 08/Feb/2025