रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात मणक्याचे यशस्वीरित्या ऑपरेशन

रत्नागिरी : शिरगाव येथील राहणाऱ्या नैना मयेकर या गेल्या सहा महिन्यांपासून पाठिशी नस दबल्याने आजारी होत्या. त्यामुळे त्यांना त्यांच्या पायात मुंग्या व वेदना होत होत्या. तसेच पायाची ताकदही कमी झाली होती. याबाबत त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमधील अस्थिरोगतज्ञ डॉ. निखिल देवकर यांचा सल्ला घेतला. त्यावेळी त्यांनी मणक्याचे ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. जर हे ऑपरेशन खाजगी रूग्णालयात करायचे झाले असते तर एक लाखाच्यावर खर्च गेला असता मात्र डॉ. निखिल देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हे ऑपरेशन यशस्वीरित्या मोफत करण्यात आले.

याबद्दल मयेकर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, अस्थिरोग तज्ञ डॉ. निखिल देवकर, व त्यांच्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:58 PM 08/Feb/2025