राजापूर : कोल्हापूर जिल्हातील टोप येथील ट्रेल हंटर्स ग्रुपच्या सदस्यांनी आरोग्य, इंधन वाचवा आणि पर्यावरण जनजागृतीसाठी टोप ते रत्नागिरी जिल्हातील राजापूर तालुक्यातील कशेळी समुद्र किनारा अशी १५७ कि. मी. अंतराची सायकल राईड केली.
ही सायकल राईड टोप गावापासून सुरुवात झाली वडणगे, यवलूज, कळे, करजफेण, पेंडाखळे, मौसम, अणुस्कुरा, पाचल, ओणी, राजापूर, आडीवरे ते कशेळी समुद्रावरील देवघळीच्या बीचपर्यंत अशी १५७ कि. मी. ची सायकल राईड ग्रुपच्या २० सदस्यांनी पूर्ण कली. हा ग्रुप दररोज २० कि. मी. सायकल राईड परिसरात करत असतो.
ट्रेल हंटर्स ग्रुपच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. दरवर्षी आषाढी एकादशीला पेठ वडगाव ते पंढरपूर, पेठ वडगाव ते तारकर्ली, दांडेली, गणेशगुळे, टोप ते गोवा, टोप ते हुबळी, चांदोली, उदगिरी, बोरबेट, दुधसागर धबधबा अशा सायकल राईड केल्या आहेत. पेठवडगाव न.प.च्या पर्यावरण जनजागृतीसाठी सायकल राईड, इंधन वाचविण्यासाठी सायकल राईड केली जातात.
प्रदूषण महामंडळाच्या प्रदूषण विषयक जनजागृती रॅलीत सहभागी, सायकल बाबत डॉ. प्रदीप पाटील यांनी सांगितले की, दररोज प्रत्येकाने किमान २० कि.मी. सायकल चालविणे आरोग्यासाठी हितावह आहे. सायकलिंगमुळे शरीरासह मेंदूतील नसा कार्यक्षम होतात. माणूस निरोगी राहतो. आळस जाऊन संपूर्ण दिवस ताजातवाना जातो. तसेच आरोग्याच्या बऱ्याच समस्या दूर होतात. ट्रेल हंटर्स ग्रुपतर्फे दरवर्षी आरोग्य व पर्यावरण विषयक जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.
या राईडला ट्रेल हंटर्स ग्रुपचे प्रमुख डॉ. प्रदीप पाटील, डॉ. मिलिंद कुंभार, डॉ. अभय पाटील, डॉ. उमेश खताळ, डॉ. सत्यदीप चिकबीरे, केरबा पाटील, नंदकुमार साळुंखे, संजय कुशीरे, प्रताप पाटील, संकेत घाटगे, बाजीराव मिसाळ, डॉ. महेश थोरात, डॉ. शिशिकांत कुंभार, प्रदीप निकम, राहुल पाटील गुरुजी, वीरेंद्र चौगुले, राहुल चौगुले, पवन जंगम, ओंकार पाटोळे, आदी सहभागी झाले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:38 PM 10/Feb/2025














