Guhagar : वेलदूर नवनगर मराठी शाळेमध्ये महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

गुहागर : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदूर नवनगर मराठी शाळेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वर्गीय पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक पालक संघाच्या सचिव सुषमा गायकवाड मॅडम ह्या होत्या. त्यावेळी मुख्याध्यापक मनोज पाटील, धन्वंतरी मोरे, संस्कार रोहीलकर, आर्या नाटेकर, अर्णवी नाटेकर, श्रीयश जांभारकर, शौर्य पालशेतकर, आरोही रोहीलकर व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. त्यावेळी विद्यार्थी व शिक्षक यांची भाषणे झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुषमा गायकवाड मॅडम म्हणाल्या की वेलदूर नवनगर मराठी शाळेमध्ये स्वच्छता अभियान यशस्वी झालेले आहे. स्वच्छता ही सेवा अंतर्गत सागरी किनाऱ्याची स्वच्छता, बस स्टॅन्ड येथील स्वच्छता, श्रीराम मंदिर परिसरातील स्वच्छता पाऊलवाटा रस्ते सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करण्यात आलेली आहे. या मध्ये पालक ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. महात्मा गांधी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण वाटचाल केली पाहिजे. त्यांच्यातील शिस्त, संयमी, नियमितपणा, विनम्रता, साधेपणा हे गुण आपण आत्मसात केले पाहिजे. कार्यक्रमाचे, बहारदार असे सूत्रसंचालन
धर्मांतरी मोरे यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:10 PM 02/Oct/2024