खेड : राज्याच्या कानाकोऱ्यात विखुरलेल्या प्रत्येक कदम घराण्याला संघटित करण्याची प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. कदम परिवारातील प्रत्येक तरुणाला योग्य संधी उपलब्ध करून देण्यासह त्यांच्या प्रगतीसाठी सदैव कटिबद्ध राहीन, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.
अखिल क्षत्रिय मराठा कदम परिवाराच्या वतीने जामगे येथील कोटेश्वरी मानाई देवीच्या प्रांगणात दोन दिवसीय कदम घराण्याच्या ७ व्या राज्यस्तर कुलसंमेलनाची सांगता समारंभाप्रसंगी ते बोलत होते.
ते म्हणाले, क्षत्रिय मराठा कदम परिवाराच्या माध्यमातून गेली ७ वर्षे सातत्याने महाराष्ट्रासह भारतातील विविध ठिकाणच्या कदम परिवाराला ‘एकत्र आणण्याचे सुरू असलेले कार्य कौतुकास्पद आहे. आपण किती प्रगती केली हे महत्वाचे नसून आपण किती लोकांना सक्षम करून उभे केले हे महत्वाचे आहे. कदम घराण्याच्या प्रगतीसाठी सर्वांनीच एकजुटीनी राहायला हवे, असे माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम म्हणाले, पुढील ८वे राज्यस्तरीय कुलसंमेलन नाशिक-निफाड येथे होणार असल्याचे जाहीर केले.
बाबुराव कदम कोहळीकर, डॉ. सतीश कदम, माजी आमदार अनिल कदम, अखिल, महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्ष मनोज कदम, उद्योजक सुनील कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम, राज्य क्षत्रिय मराठा- कदम परिवाराचे अध्यक्ष अमरराजे कदम, सचिव रामजी कदम, उपाध्यक्ष दादासाहेब कदम, याप्रसंगी खासदार विशाल पाटील, आमदार सहसचिव मुरलीधर सागर कदम, गणेश कदम, राजन कदम, डॉ. हरी कदम, किशोर कदम, चंदशेखर कदम, मंगेश कदम, मनोज कदम, श्रीमती स्नेहल मोहन कदम, शशिकांत कदम यांच्यासह राज्यातील सर्व कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.
कर्तबगार बांधवांचा सन्मान कुलसंमेलनात व्याख्यात्यांनी कदम घराण्याच्या इतिहासाची पाने उलगडत खरा इतिहास कदम समाज बांधवांसमोर उभा केला. याचवेळी अखिल भारतीय क्षत्रिय मराठा कदम परिवाराच्यावतीने माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा सन्मान करण्यात आला. याचवेळी विविध क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्ववान कदम बंधू व भगिनींचाही सन्मान करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:34 PM 12/Feb/2025














