रत्नागिरी : रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशाचा मोबाईल लांबवला

रत्नागिरी : रेल्वे प्रवासादरम्यान अज्ञाताने प्रौढाचा मोबाईल लांबवला. ही घटना १ जानेवारी रोजी पहाटे ३ वा. पूर्वी रेल्वे भोके परिसरात असताना घडली आहे. याबाबत राजेश्वर प्रसाद सिंग (५०, रा. कानपूर, उत्तरप्रदेश) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, १ जानेवारी रोजी ते राजधानी एक्स्प्रेसमधून दिल्ली ते तामिळनाडू असा प्रवास करत होते. प्रवासादरम्यान ते झोपी गेले असता या संधीचा फायदा उठवत चोरट्याने त्यांच्या बॅगेच्या बाजूच्या कप्प्यातून १० हजार रुपये किंमतीचा रिअल कंपनीचा मोबाईल लांबवला. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 AM 14/Feb/2025