चिपळूण : कृषी क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र व राज्यस्तरावरून अनेक योजना राबविल्या जातात. त्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावण्यासाठी व योग्य, पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभजलदगतीने, सुलभ व पारदर्शक पद्धतीने पोचवण्यासाठी ‘अॅग्रीस्टॅग’ उपक्रमाचा उपयोग होणार आहे. ‘अॅग्रीस्टॅग’ उपक्रमात शेतकरी बांधवांनी नोंदणी करून शेतकरी ओळखपत्र बनवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन मंडळ कृषी अधिकारी मनोज गांधी यांनी केले आहे.
शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा उभारणे हा ‘अॅग्रीस्टॅग’ उपक्रमाचा उद्देश असून, शेतकऱ्यांची आधार संलग्न माहिती संच, फार्मर आयडी तयार करून अद्ययावत करणे हा मोहिमेमागील उद्देश आहे. पीएम किसान योजनेसाठी आवश्यक अटी पूर्ण करून लाभ प्राप्त करण्यात सुलभता यावी, किसान क्रेडिट कार्ड, इतर पीक व शेती कर्जे, पीक विमा व आपत्ती व्यवस्थापन सर्वेक्षण कामात सुलभता आणणे हा या योजनेचा उद्देश आहे. किमान आधारभूत किंमतीवर शासकीय खरेदी केंद्रासाठी जी आवश्यक नोंदणी करणे बंधनकारक असते, ती देखील यातून साध्य करता येणार आहे. पीएम किसान योजना, फळबाग लागवड योजना, सूक्ष्म सिंचन योजना, मागेल त्याला शेततळे योजना, कृषी यांत्रिकीकरण योजना, संरक्षित शेतीसारख्या कृषीविषयक योजनांसाठी तसेच पीकविमा, आपत्ती व्यवस्थापन सर्वेक्षण, कृषी कर्जवाटप यांसारख्या लाभांसाठी शेतकरी नोंदणी आवश्यक आहे.
या योजनेत शेतकऱ्यांची नोंदणी फेब्रुवारी २०२५ अखेरपर्यंत शंभर टक्के पूर्ण करण्याचे नियोजन कृषी व महसूल विभागाच्या सहकार्यान करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नोंदणी करण्यासाठी कॅम्प मोड, सीएससी मोड व सेल्फ मोड असे तीन मोड ठरवण्यात आलेले आहेत. त्यातून फार्मर आयडी कार्ड तयार करण्यात येणार आहे.
कृषी विषयक सल्ले देणार
या फार्मर आयडीच्या माध्यमातून विविध कृषी विषयक सल्ले देखील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. या योजनेत आधार संलग्न माहिती संच, हंगामी पिकांची माहिती संच तसेच भू- संदर्भीय भूभाग असणारा करण्यात येणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 21/Feb/2025
