गुहागर : माजी शिक्षकांकडून कुडली क्र. ३ शाळेसाठी वीस हजार रुपये

गुहागर : तालुक्यातील कुडली शाळा क्र. ३ मध्ये आवश्यक साहित्य घेण्यासाठी लोकसहभागातून निधी संकलनाचे आवाहन मुख्याध्यापकांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत सर्व माजी शिक्षकांनी ही जबाबदारी स्वीकारत वीस हजार रुपये गोळा केले. त्याचबरोबर दोघांनी साहित्य देणगी स्वरूपात उपलब्ध करून दिले. जमा झालेल्या रकमेतून शाळेसाठी साहित्य खरेदी करण्यात आले.

कुडली नं. ३ (माटलवाडी) शाळेची डागडुजी जिंदाल कंपनीच्या सीएसआर फंडातून करण्यात आली. शाळेत कमी असलेल्या वस्तूंच्या खरेदीसाठी मुख्याध्यापक संदेश सावंत यांनी सर्व माजी शिक्षकांना आवाहन केले. सर्व माजी शिक्षकांनी ग्रामस्थांच्या आणि देणगीदारांच्या सहकार्याने साहित्य खरेदीसाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले. त्यांच्या आवाहनाला सर्व माजी शिक्षकांनी प्रतिसाद दिला. माजी शिक्षक सिद्धार्थ जाधव व ममता जाधव, विष्णू आग्रे व डॉ. ओंकार आग्रे, संदीप सनगरे, भास्कर गावडे, नीलेश खामकर, मगन गांगुर्डे, राम महाले, ज्ञानदेव मोरे यांनी २० हजार रुपये गोळा केले. तसेच सुहास गायकवाड व प्रमोदिनी गायकवाड यांनी पंखा, गणेश वायचाळ यांनी डायस भेट दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:42 PM 21/Feb/2025