खेड : मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळणावर अपघातांची मालिका सुरू असल्याने संरक्षक भिंत पूर्णतः खचत चालली आहे. राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून संरक्षक भिंतीच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले असले तरी केवळ मलमपट्टी केली जात असल्याने वाहनचालकांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील खवटीपासून परशुराम घाटापर्यंत झालेल्या चौपदरीकरण कामामुळे वाहनचालकांचा प्रवास सुस्साट झाला असला तरी भोस्ते घाटातील अवघड वळण ‘डेंजर स्पॉट’च ठरत आहे. गेल्या ४ महिन्यात भोस्ते घाटातील अवघड वळणावर ३०हून अधिक अपघात घडले आहेत. यात अवजड वाहतुकीच्या वाहनांची संख्या सर्वाधिक आहे. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांवरील चालकांचे नियंत्रण सुटून थेट घाटातील संरक्षक भिंतीवर आदळत असल्याने भिंत खचत आहे. यासाठी साऱ्या उपाययोजना फोल ठरल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:50 PM 21/Feb/2025
