खेड : भरणेत वाहतूक कोंडी

खेड : भरणे येथील मध्यवर्ती ठिकाण नानाविध समस्यांच्या गर्तेत अडकले आहे. येथे वाहने वळवण्यासाठी जागा अपुरी असल्याने सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालकांसह पादचारी मेटाकुटीस आले आहेत. याबाबत राष्ट्रीय महामार्ग खाते उपाययोजना करत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील मध्यवर्ती ठिकाण नेहमी गजबजलेले असते. भरणे येथे चौपदरीकरणातील उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू असली तरी पुलाखालील दोन्ही बाजूला असलेले सर्व्हिस रोड अरुंद आहेत. त्यातच बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. मध्यवर्ती ठिकाणी अवजड वाहने वळवताना कसरत करावी लागत आहे. यामुळे वाहनचालकांसह पादचारी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे नानाविध समस्यांच्या गर्तेत अडकलेल्या मध्यवर्ती ठिकाणी दुर्घटना घडल्यानंतरच राष्ट्रीय महामार्ग खाते जागे होणार का, असा संतप्त सवालही उपस्थित केला जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:22 PM 21/Feb/2025