Ratnagiri, Pavas : विद्यार्थिनीनी क्षणिक सुखाला बळी न पडता शाश्वत सुखाचा विचार करावा : वैदेही सावंत

पावस : विद्यार्थिनीनी कोणत्याही क्षणिक सुखाला बळी न पडता शाश्वत सुखाचा विचार करावा. त्याप्रमाणे येणाऱ्या परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जावे. महिला सक्षमीकरणासाठी असणारे विविध क्रमांक याची माहिती घेणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन वैदेही सावंत यांनी केले.

रत्नागिरी ratnagiri तालुक्यातील शिवार आंबेरे येथील पेजे महाविद्यालयात महिला सुरक्षितता व शिष्यवृत्ती या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा झाली. त्यामध्ये सावंत यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला प्राचार्य प्रमोद वारीक, संस्थेचे सहसचिव अविनाश डोर्लेकर, प्रा. शालिनी चांदले आदी उपस्थित होते. सावंत यांनी शासकीय योजना व शिष्यवृत्ती याची माहिती देऊन विद्यार्थिनींनी स्वतः सक्षम बनावे असे आवाहन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:52 PM 03/Oct/2024