चिपळूण : महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभागअंतर्गत रत्नागिरी जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात २० ते २३ फेब्रुवारी या कालावधीत वैद्यकीय व दंतशल्य चिकित्सा आरोग्य शिबिराचे तसेच दिव्यांग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार शेखर निकम यांच्यासह चिपळूणमधील मान्यवरांनी उपस्थित राहून शिबिराची माहिती घेतली.
उद्घाटनप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. असितकुमार नरवाडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव,कामथे सरपंच हर्षदा हरी कासार, जिल्हा माध्यम अधिकारी एन जी बेंडकुळे, असांसर्गिक आजार जिल्हा समन्वयक डॉ. यश प्रसादे आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरामध्ये एकूण २९४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान २५ रुग्णांचे निदान करून शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. यातील १० शस्त्रक्रिया आज (२१ फेब्रुवारी) करण्यात आल्या असून, उर्वरीत शस्त्रक्रिया उद्या (२२ फेब्रुवारी) करण्यात येणार आहेत. तसेच ८४ दिव्यांग रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी ५२ लाभार्थ्यांना दिव्यांग प्रमाणपत्राचे वाटप २० फेब्रुवारी रोजीच करण्यात आले.
या शस्त्रक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. भास्कर जगताप, डॉ. रत्नाकर घाणेकर, डॉ. कांचन मदार, डॉ. विजयकुमार कांबळे, डॉ. सतिश गवळे यांच्यामार्फत करण्यात येत आहेत. डॉ. महेश भागवत, डॉ. नितिन धुमाळ यांनी भूलतज्ञ म्हणून कामकाज पाहिले. तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. असित नरवाडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय सानप, डॉ. अमरसिंह यादव देशमुख, डॉ. अविनाश कापुरे, डॉ. गणेश चव्हाण, इनचार्ज सिस्टर, अधिपरिचारीका, तसेच वर्ग ३ कर्मचारी व वर्ग ४ कर्मचारी तसेच सर्व आरबीएसके टीम, उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी कळत नकळत दिलेल्या सेवामुळे यशस्वीपणे पार पडले. २३ फेब्रुवारी रोजी शिबिरातील सर्व रुग्ण शस्त्रक्रियेनंतरचे औषधोपचार होऊन घरी सोडण्यात येणार असल्याचे कामथे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. असित नरवाडे यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:02 PM 22/Feb/2025
