खेड : कमळ आणि बाण २०१४ ला वेगवेगळा होता. त्यामुळे घड्याळ निवडून आले. २०१९ ला ते राष्ट्रवादीतून सेनेत आले. शरद पवार यांनी राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्षपद देखील बहाल केले; पण केवळ आपल्या फायद्यासाठी यांनी सन २०१९ ला धनुष्य हाती घेतले. म्हणजे केवळ आपल्या भल्यासाठी घड्याळ सोडून दिले. बाण चिन्हावर निवडून आले. हा मतदार संघ केवळ आपल्या फायद्यासाठी वापरून स्वतःचा विकास करून मतदार आजही उपेक्षित आहे, अशी टीका माजी आमदार विनय नातू (Vinay Natu) यांनी विद्यमान आमदार भास्कर जाधव यांचे नाव न घेता केला.
खेड तालुक्यातील तळवटपाल येथील ग्रामस्थांनी माजी आमदार नातू (Vinay Natu) यांच्याकडे मतदार संघातील अनेक व्यथा मांडल्या. पंधरागाव पट्ट्यातील तळवटपाल, तळवट व जावळी या गावातील ग्रामस्थांशी चर्चा केली. या गावभेट दौऱ्यात ग्रामस्थांनी गेल्या १५ वर्षातील विविध समस्या सोडवण्यासंदर्भात नातू यांच्याकडे विनंती केली. या वेळी नातू म्हणाले, गुहागर मतदारसंघातील पंधरागाव पट्ट्यात त्यांचा गावभेट दौरा सुरू केला. विधानसभेला मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार उभा राहणार आहे. त्यामुळे या मतदारसंघातून गेली १५ वर्षे असलेली मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी आपण महायुतीला साथ द्या. या वेळी मोबाईल नेटवर्क, रस्ते, तळवटपाल धरणाच्या कालव्यातून मुबलक पाणी मिळाल्यास दरवर्षी उन्हाळ्यात भासणाऱ्या पाणीटंचाईपासून मुक्ती असे विविध विषय स्थानिक ग्रामस्थांनी नातू (Vinay Natu) यांच्याकडे मांडले. हे विषय येत्या वर्षभरात मार्गी लावण्याचे आश्वासन माजी आमदार नातू (Vinay Natu) यांनी दिले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:15 PM 03/Oct/2024
