प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रातर्फे सोलगाव येथे प्रशिक्षण

राजापूर : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठअंतर्गत रत्नागिरीतील भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रातर्फे सोलगाव (ता. राजापूर) येथे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय समन्वित उपवन पिके संशोधन प्रकल्पांतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन राजरत्न महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या समन्वयाने करण्यात आले होते. यावेळी नारळ रोपे, गांडूळ खत आणि मित्रकीटक यांचे निविष्ठा स्वरूपामध्ये लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. किरण मालशे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. या प्रशिक्षण वर्गाला सोलगावच्या सरपंच तनिष्का तिर्लोटकर, क्षेत्रीय अभियान व्यवस्थापक अर्चना भंडारी, टेक्नोसर्व्ह संस्थेचे सुशील कुमार रॉय व कुमार विनीत उपस्थित होते.

नारळ लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान यावर डॉ. सुनील घवाळे, नारळ पीक संरक्षण यावर डॉ. संतोष वानखेडे, तर नारळ पीक व्यवस्थापन आणि आंतर व मिश्र पिकांची लागवड यावर डॉ. किरण मालशे यांनी मार्गदर्शन केले. प्राजक्ता कदम यांनी सूत्रसंचालन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:55 PM 25/Feb/2025