संगमेश्वर : ‘पीएम किसान’चे पैसे अचानक बंद; रहिवासी नसल्याचा दावा

रत्नागिरी : पीएम किसान योजनेचे पैसे अचानक बंद झाले. चौकशी केली असता महाराष्ट्राचा रहिवाशीच नसल्याचे सांगितले गेले. मुळात १० हप्ते मिळाले कसे, असा सवाल उपस्थित करत संगमेश्वर तालुक्यातील निवे बुद्रुक येथील अजित बुधाजी जाधव यांनी या प्रकरणाची चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

पीएम किसान योजनेला आपण २०२२ पर्यंत लाभार्थी होतो. आतापर्यंत १० हप्ते मिळाले. परंतु नंतर हप्ते बंद झाले. सर्व कागदपत्रे परिपूर्ण असताना दहा हप्ते मिळाल्यानंतर सातबाऱ्यावर पिकपाणी नोंद नसल्याचे कारण देत प्रथम हे हप्ते बंद केले.

त्यानंतर आपण १२ ऑगस्ट २०२४ला तहसील कार्यालयात पुन्हा अर्ज केला. मात्र यावेळी तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी नाहीत असे उत्तर दिले गेले, असे या निवेदनात म्हटले आहे.

मी जर महाराष्ट्रातील रहिवासी नसेन तर मला दहा हप्ते मिळाले कसे? असा सवाल अजित जाधव यांनी उपस्थित केला आहे. याबाबत सखोल चौकशी करून मला न्याय द्यावा, तसेच हे पैसे माझ्या खात्यात वर्ग करावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 04/Oct/2024