पावस : पावस परिसरामध्ये बीएसएनएलच्या टॉवरवरील सेवा वारंवार खंडित होत असल्यामुळे ग्राहक हैराण झाले आहेत.
पावस, गणेशगुळे, कुर्धे, पूर्णगड आदी परिसरामध्ये बीएसएनएल कंपनीने ग्राहकांना सेवा देण्यासाठी टॉवर उभारले आहेत; परंतु या टॉवरची सेवा चांगली नसल्याने ही सेवा वारंवार बंद पडते. त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे. या संदर्भात वारंवार तक्रार करूनही ग्राहकांना चांगली सुविधा दिली जात नाही. टॉवरची बॅटरी चांगली नसल्याने विद्युतपुरवठा खंडित झाल्यानंतर ही संपूर्ण सेवा पूर्णपणे खंडित होते. तसेच ब्रॉडबॅण्ड सेवाही वारंवार खंडित होते.
सर्व कारभार गतिमान होण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला ब्रॉडबॅण्ड सेवा देण्यासाठी सर्व ठिकाणी प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी निधी उपलब्ध करून अंडरग्राउंड लाईन टाकण्यात आल्या; परंतु त्या ठिकाणी खासगी कंपन्या केबल टाकत असल्यामुळे या बीएसएनएलच्या केबल जागोजागी तोडल्या जातात. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीला नेटबाबत अडचणी निर्माण होत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:18 PM 01/Mar/2025














