संगमेश्वर : संगमेश्वरातील शांतारामबुवांनी तुणतुण्याची परंपरा जपली. नवरात्र, घटस्थापनेला सुरुवात झाली असून, पारंपरिक तुणतुण्यासह, अंबाबाईं देवीच्या आरतीने संगमेश्वरातील शांताराम बुवांनी घरोघरी जाण्यास सुरुवात केली आहे. गेले चाळीस ते पंचेचाळीस वर्षे ही परंपरा जोपासत आले आहेत.
घटस्थापनेपासून रोज नऊ दिवस प्रत्येकाच्या घरी जाऊन अंबाबाईंची सुमधूर आवाजात आरतीचे तुणतुण्याच्या साथीने गायन करून धामणी गोळवली परिसराचे शांताराम बुवा मन मंत्रमुग्ध करतात. तोच खणखणीत आवाज, सुस्पष्ट उच्चार, पहाडी देह, तोच रूबाबदार फेटा, सफेद धोतर, शान असलेला झब्बाकोट घालणारे शांताराम यांचे वय आता सुमारे पंचाहत्तर आहे. आजही ते ही परंपरा जोपासत आहेत.
गोळवलीचे विवेक पाध्ये यांनी आज सकाळी त्यांच्या घरी आरतीसाठी आलेल्या शांताराम बुवांचा सन्मान करून कौतुकही केले. ही प्रथा व कला यापुढे खरंच जोपासणे गरजेचे आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 PM 04/Oct/2024
