चिपळूण : पाचवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी गैरवर्तन झाल्याचा प्रकार बुधवारी अलोरे परिसरातील एका शाळेत घडला आहे. याप्रकरणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याची पोलीस कसून चौकशी करीत आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी या शाळेत महात्मा गांधी याच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संबधित शिक्षकेतर कर्मचाऱ्याने या विद्यार्थिनीशी गैरवर्तन केले. त्यामुळे शाळा सुटल्यावर मुलीने घडला प्रकार तिच्या पालकांना सांगितला. यामुळे पालकांनी अलोरे-शिरगाव पोलीस ठाणे गाठत घडला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानुसार पोलिसांनी संबधितावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.
याची माहिती पंचक्रोशीत पसरताच शाळेतील अन्य मुलांच्या पालकांसह ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबधितावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 04-10-2024
