लांजा : भांबेड येथे उद्या चिखल नांगरणी स्पर्धा

लांजा : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे लांजा तालुका संपर्क अध्यक्ष किरण रेवाळे यांच्या सौजन्याने लांजा तालुक्यातील भांबेड येथे ५ रोजी राज्यस्तरीय चिखल नांगरणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा भांबेड येथील दत्त मंदिर (पवारवाडी) येथे सकाळी ११ वाजता होणार आहे. स्पर्धा गावठी व घाटी अशा दोन गटांमध्ये होणार आहे. यामध्ये प्रथम क्रमांक फ्रिज, द्वितीय क्रमांक ३२ इंची एलसीडी टीव्ही, तृतीय क्रमांक पिठाची घरघंटी, चौथा क्रमांक २४ इंची एलसीडी टीव्ही, पाचवा क्रमांक कुलर, सहावा क्रमांक होम थिएटर, सातवा क्रमांक कुलर व प्रत्येकी ढाल यासह गावपातळीवरील एक मनाची दोन फुटी गदा अशी भरघोस आकर्षक बक्षिसे देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित रहावे, तसेच स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी किरण रेवाळ, पिंट्या मटकर, सिद्धेश धडम, बाबा हेगीष्ट, समीर वाघू यांच्याशी संपर्क साधावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:17 PM 04/Oct/2024