सावर्डे : प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वच्छतेसह परिसर स्वच्छतेला जास्तीत जास्त महत्त्व द्यावे या उद्देशाने स्वच्छतेविषयी चर्चासत्राचे आयोजन सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे येथे करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या ‘स्वच्छता हीच सेवा’ टप्पा दोन या उपक्रमांतर्गत विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. स्वच्छतेचे महत्व विद्यार्थ्यांमध्ये रुजावे त्याचबरोबर त्यांनी आपल्या पालकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून द्यावे व याद्वारे जनजागृती व्हावी व स्वच्छता जीवनात अत्यंत महत्त्वाची आहे. ही माहिती समाजात पोहोचावी यासाठी स्वच्छते संबंधीची शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली. या कार्यक्रमाला प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे यांनी जीवनातील स्वच्छतेचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:53 PM 04/Oct/2024