रत्नागिरी : प्रतिवर्षाप्रमाणे अश्विन शुद्ध सप्तमी, शके १९४६, गुरुवार दि. १० ऑक्टोबर २०२४ रोजी ‘श्रीमान यशवंत हरी गोखले भवन’ नाचणे – साळवी स्टॉप लिंक रोड, रत्नागिरी येथे कुवारबांव पंचक्रोशी ब्राह्मण सभेतर्फे नवरात्रौत्सवानिमित्त महालक्ष्मी पूजन उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महालक्ष्मी वसा पूजन करणाऱ्या सुवासिनींनी पूजेसाठी सकाळी ठिक ९.०० वा. उपस्थित रहावे. सदर कार्यक्रमास उपस्थित रहाण्यासाठी पूर्व नावनोंदणी आवश्यक असून सदर नाव नोंदणी सौ. आदिती भावे (मोबा. ७०२०३६८६४९) यांचेशी संपर्क साधावा. पूजा साहित्यासह नाव नोंदणी शुल्क रु. ५००/- आहे.
तसेच सायं. ७.०० वाजल्यापासून होणाऱ्या महालक्ष्मी जागराला जास्तीत जास्त हिंदु बंधु-भगिनींनी उपस्थित राहून जागराचा व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन कुवारबांव पंचक्रोशी ब्राह्मण सभेतर्फे करण्यात आलेले आहे. तसेच सोमवार दि. ०७ ऑक्टोबर २०२४ रोजी ललिता पंचमी निमित्त सकाळी ठिक १०.०० वा. श्रीसुक्त आवर्तने आयोजित केली आहेत. तरी श्रीसुक्त म्हणणाऱ्यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित रहावे.
वरील दोन्ही कार्यक्रमाविषयी अधिक माहिती हवी असल्यास श्री. अनंत आगाशे, (मोबा. ७०८३१६२९७५) अध्यक्ष, कुवारबांव पंचक्रोशी ब्राह्मण सभा यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:21 04-10-2024