कोकण विभाग विद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालय सलग दुसऱ्या वर्षी विजेते

रत्नागिरी : देवरूख येथे घेण्यात आलेल्या कोकण विभाग विद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेत येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाने सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद मिळविले. यावर्षीदेखील सिद्धेश फणसेकर कॅप्टन असलेल्या गोगटे जोगळेकर महाविद्यालय संघाने उत्तम सांघिक खेळाचे प्रदर्शन करून विजयश्री खेचून आणली.

कणकवली कॉलेज विरुद्ध अंतिम सामना अतिशय अटीतटीचा झाला. मात्र सिद्धेशच्या कुशल नेतृत्वामुळे संघाने विजेतेपद पटकावले.

या संघामध्ये सिद्धेश फणसेकर, मिहिर वाघाटे, अथर्व कवितके, सुयोग कदम, आदित्य शिर्के, अथर्व खेडेकर या खेळाडूंचा सहभाग होता. या स्पर्धेसाठी संघ व्यवस्थापक व गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले. सिद्धेश फणसेकर याची आंतर विद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेसाठी यावर्षीही निवड झाली आहे. संस्था पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 18-09-2024