दापोलीत आज विधी सेवा प्राधिकरणाचे महाशिबिर

रत्नागिरी : दापोलीत (दि. ५ ऑक्टोबर) शनिवारी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, राज्य विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, दापोली तालुका विधी सेवा समिती आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ दुर्बल घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी महाशिबिर होणार आहे.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरय्या सभागृहात हे शिबिर होईल. महाशिबिराचे उद्घाटन सकाळी १० वाजता मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती माधव जे. जामदार यांच्या हस्ते होईल.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुनील गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबिर होईल. यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार उपस्थित राहणार आहेत. या महाशिबिरामध्ये केंद्र व राज्य शासनाचे विविध विभाग, बँका, पोस्ट ऑफिस यांच्यामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती उपलब्ध होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 05-10-2024