संगमेश्वर : राधा गोविंद फाऊंडेशन सावर्डेतर्फे संगमेश्वर तालुक्यात महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा रंगणार आहे.
महिलांसाठी रोजच्या धकाधकीच्या जीवनातून विरंगुळा मिळावा व महिलांनी एकत्रित येऊन, खेळ खेळून मनमुराद आनंद घेता यावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ५ रोजी आंबतखोल पंचक्रोशी, ६ रोजी मुचरी पंचक्रोशी, ७ रोजी माखजन पंचक्रोशी, ८ रोजी धामापूर पंचक्रोशी, ९ रोजी कोसुंब पंचक्रोशी, १० रोजी पाटगाव पंचक्रोशी, १३ रोजी निवे पंचक्रोशी, १४ कसबा पंचक्रोशी येथे होणार आहे. सर्व ठिकाणी हा कार्यक्रम दु. १ ते ५ या वेळेत होणार आहे.
माखजन येथील कार्यक्रमात मुरडव, आरवली, कोंडिवरे, आंबव पोंक्षे, बुरंबाड, सरंद, माखजन, शिरंबे, कासे, कळंबुशी गावांसाठी होणार आहे. धामापूर येथे होम मिनिस्टर कार्यक्रमात धामापूर, करजुवे, मावळंगे, कुंभारखाणी, पेढांबे, नारडुवे गावांसाठी होणार आहे. वृषभ आकिवाटे सादरीकरण करणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 05-10-2024