Ratnagiri : विश्वकर्मा योजनेंतर्गत व्यवसायासाठी कर्ज

रत्नागिरी : पारंपरिक व्यवसायाला उभारी देण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान मंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत व्यवसाय उभारण्यासाठी कर्ज दिले जाणार आहे. सोबतच व्यवसायाचे प्रशिक्षणसुद्धा दिले जाणार आहे.

ग्रामीण भागातील अर्थप्रणाली ही १८ बलुतेदारांवर अवलंबून होती. या लोकांना गावातच रोजगार मिळत असल्याने त्यांना शहरात जाण्याची गरज नव्हती. काळाच्या ओघात अनेकांचे व्यवसाय बुडाले. पुन्हा या व्यवसायांना चालना देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने अलीकडेच पंतप्रधान विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. या योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. लोहार, सोनार, सुतार, मोची आदी समाजांतील नागरिकांची पारंपरिक कौशल्य अधिक विकसित करण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश लोहार, सोनार, सुतार, मोची आदी १८ प्रकारच्या पारंपरिक कलाकारांचा विकास करून त्यांना अर्थार्जनाचे साधन उपलब्ध करून देणे आहे. याद्वारे या कारागिरांना व्यवसायाचे प्रशिक्षणही दिले जाते. या प्रशिक्षणादरम्यान कारागिरांना १५ हजार रुपयांचे आर्थिक साहाय्यही देण्यात येते. योजनेत समाविष्ट केलेल्या १४० जातींपैकी कोणत्याही एका जातीचा नागरिक असणे आवश्यक आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 AM 05/Oct/2024