मंडणगड : तालुक्यातील कुंबळे येथील हुतात्मा तुकाराम बबन भोईटे हायस्कूल व ग्रामपंचायत कुंबळे यांच्या संयुक्त विद्यमाने भारजा नदीवर श्रमदानातून बंधारा बांधून ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही संकल्पना प्रत्यक्षपणे राबविण्यात आली. बंधारा बांधण्यासाठी सरपंच सानिका पाटील, उपसरपंच दीक्षा दळवी, अनिल लोखंडे, सदस्य महेंद्र पाटील, मुख्याध्यापक सुनील घाणेकर उपस्थित होते. हे बंधारे बांधल्यामुळे परिसरातील पाणीटंचाई लांबेल, अशी आशा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 PM 13/Mar/2025














