रत्नागिरी शहर पोलिसांचे मिऱ्या येथे संचलन

रत्नागिरी : होळी, शिमगोत्सव, रमजान आणि गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी शहर पोलिसांनी मिऱ्यावर भाटकरवाडी ते नवलाई पावणाई मंदिर, असे संचलन केले.

पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस निरीक्षक सतीश शिवरकर यांच्या नेतृत्वाखाली हे संचलन करण्यात आले. सणासुदीच्या दिवसांमध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडून गालबोट लागू नये, यासाठी पोलिस दलाने सायंकाळी हे संचलन केले. मिऱ्या येथे भाटकरवाडा, श्रीराम मंदिर, जाकीमिऱ्या, अलावा, शिवलकरवाडी, चरकरवाडी, कुरणवाडी, नवलाई-पावणाई मंदिर, त्यानंतर पेठकिल्ला भाटकरवाडा, मशीद, जोतिबा मंदिर असे हे संचलन करण्यात आले. यामध्ये दोन पोलिस उपनिरीक्षक, २२ पोलिस अमलदार, १९ होमगार्ड सामील होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:18 PM 13/Mar/2025