महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारचे योगदान : आ. योगेश कदम

खेड : महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने योगदान दिले आहे, असे प्रतिपादन आ. योगेश कदम यांनी येथे केले. उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जीवनज्योती प्रभाग संघ भरणे, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती खेड यांची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी दि. ३० रोजी भरणे येथे झाली, त्यावेळी ते बोलत होते.

उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जीवनज्योती प्रभाग संघ, भरणेची वार्षिक सभा सोमवार दि.३० रोजी भरणे श्री काळकाई देवी मंदिरात झाली. यावेळी दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिव धाडवे उपस्थित होते.

‘उमेद’च्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमांचे यावेळी आ. योगेश कदम यांनी कौतुक केले आणि उपस्थित सर्वांशी संवाद साधला. ते म्हणाले, एक लोकप्रतिनिधी या नात्याने मतदारसंघातील विविध कामे पूर्णत्वास आणण्यासाठी सदैव सकारात्मक दृष्टीने कार्य आहे. बचत गट भवनासाठी शासनाने २५ लाखांचा निधी दिल्याची माहिती आ. योगेश दिली. कदम यांनी यावेळी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 05/Oct/2024