देवरुख : संगमेश्वर बाजारपेठ रस्त्यावर सिमेंट काँक्रिटीकरणाच्या सळ्या रस्त्यावर आल्याने पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित यंत्रणेने याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
संगमेश्वर बाजारपेठ सिमेंट कॉक्रिटीकरण रस्ता तयार केलेला आहे. गेले अनेक वर्षे हा रस्ता होऊन झाली आहेत. संगमेश्वर बाजारपेठ गणेश मंदिराजवळ काम करीत असताना सळ्या वर येऊन त्याला अडकल्याने पादचारी या ठिकाणी पडत आहेत. याचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
हे रस्ता ग्रामस्थांच्या सोयीसाठी उभारले जातात. मात्र या काँक्रीटच्या रस्त्याकडे पाहिल्यानंतर हा रस्ता केवळ नागरिकांच्या जीवाशी खेळ करण्यासाठीच उभारला असल्याचे चित्र दिसून येत आहे. गेले अनेक दिवस या सळ्या वर आल्या असताना आणि यापासून धोका असतानादेखील संबंधित ठेकेदार व शासकीय यंत्रणा याकडे दुर्लक्ष करीत आहे.
याबाबत वाहनचालक आणिक नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या रस्त्याची तत्काळ याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:58 PM 17/Mar/2025














