◼️ यापूर्वी चार वेळा शॉर्टसर्किट होऊन या बागेत लागली होती आग; नुकसान भरपाई नाही
रत्नागिरी : तालुक्यातील नेवरे राम रोड येथे एका आंबा व काजूची झाडे असलेल्या बागेला मोठी आग लागली आहे. सुमारे १८०० आंबा कलमे आणि १८०० काजूची कलमे असलेली हि बाग आहे.
याच बागेतून जाणाऱ्या महावितरणच्या लाईन मुळे शॉर्टसर्किट होऊन हि आग लागल्याचे बाग मालाकाचे म्हणणे आहे. यापूर्वी देखील चार वेळा अशीच आग लागली होती मात्र अद्यापही नुकसानभरपाई न मिळाल्याचे या बाग मालकाचे म्हणणे आहे. सुमारे ३६०० कलमे जाळून खाक झाल्याने या बाग मालकाचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या हि आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:35 18-03-2025














