रत्नागिरीत २४ मार्चपासून दर सोमवारी पाणीपुरवठा बंद

रत्नागिरी : प्रखर उन्हामुळे पाण्याचे होणारे बाष्पीभवन व पातळीत होणारी घट यामुळे खबरदारीमधून दर सोमवारी शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शीळ धरणात सध्या मुबलक पाणी असले, तरी उन्हाचा जोर वाढत असल्याने पुढील तीन महिने पाण्याचे नियोजन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दि. २४ मार्चपासून दर सोमवारी शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:11 PM 18/Mar/2025