चिपळूण : चिपळूण शहर परिसरासह तालुक्यात डीजे आणि वाद्यांच्या तालावर रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. ढोल-ताशे, डीजे तर काही ठिकाणी सनई अशा पारंपरिक वाद्य व रंगांच्या माध्यमातून रंगपंचमीत लहान मुले व तरुण रंगले होते. वाढत्या उन्हामुळे यावर्षी रंगपंचमीचा उत्साह थोडा कमी दिसून आला. मात्र, चिमुकल्यांमध्ये रंगपंचमीचा जोरदार उत्साह दिसून आला.

शहरातील विविध गृहनिर्माण सोसायट्या तसेच खंड, खंडचौकी, खंड गणेश मंदिर, विरेश्वर कॉलनी, काविळतळी, बहादूरशेख, वैश्य वसाहत, परकार कॉम्प्लेक्स परिसर, बाजारपेठ, पाग, पागमळा आदी भागात रंगपंचमीचा मोठा उत्साह दिसून आला. काही ठिकाणी महिलांनीही रंगपंचमीत सहभाग घेतला. शहरात कोठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही. ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 20/Mar/2025














