रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील शाळकरी मुले नेहमीच एसटीच्या प्रतीक्षेत असतात. मात्र एसटीच्या गलथान कारभाराचा फटका या मुलांना बसत असल्याच्या तक्रारी परिसरातून होत आहेत.
अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना मुलींचे तास चुकू नयेत, म्हणून करण्यात आलेली आहे. परंतु मुलींनाच एसटीमध्ये घेतले जात नाही. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे पासही अगोदरच काढले जातात. म्हणजेच महामंडळाला आधीच पैसे दिले जातात. तरीसुद्धा वाहक व चालक विद्यार्थ्यांना एसटीमध्ये घेत नाहीत अशा तक्रारी होत आहेत. रत्नागिरीहून पावस बसस्थानकामध्ये दुपारी १२ वाजता येणाऱ्या गाड्या २ किंवा ४ वाजता येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची अक्षरशः परवड होते. ज्या योजना शासनाने विद्यार्थ्यांसाठी आणल्या त्या महामंडळामुळे फोल ठरत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 24/Mar/2025














