रत्नागिरी : महावितरणच्या कोकण परिमंडल, रत्नागिरीअंतर्गत महावितरणला पुढील ३१ मार्चअखेर २३ कोटी ७० लाख वसूल करायचे आहेत. त्यासाठी महावितरणने मोहीम तीव्र केली आहे. वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. ३१ मार्चअखेर सर्व सुटीच्या दिवशी ही वीजबिल भरणा केंद्र सुरू राहणार आहेत. त्यामुळे बीज ग्राहकांनी चालू तसेच थकीत वीजबिल भरावे आणि आपली गैरसोय टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
चालू आर्थिक वर्षांचे केवळ ९ दिवस शिल्लक आहेत. कोकण परिमंडल रत्नागिरीअंतर्गत प्रत्येक दिवसाला २ कोटी ६३ लाख वसूल करायचे आहेत. वसुलीसाठी कर्मचारीच नाही तर मुख्य अभियंता अनिल डोये यांच्यासह सनागिरी मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता वैभवकुमार पाथोडे, सिंधुदुर्ग मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता अशोक साळुंखे यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंते आपल्या संपूर्ण टीमसह वसुलो मोहिमेत सहभागी झाले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:03 PM 24/Mar/2025














