रत्नागिरी : विजांच्या कडकडाटासह रविवारी ७.३० च्या सुमारास परतीच्या वादळी पावसाने रत्नागिरीला झोडपले. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार सायंकाळच्या सुमारास वादळासह आलेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरीपिट उडाली.
नवरात्रौत्सवासाठी नटून सजून जाणाऱ्या दांडिया खेळणाऱ्यांच्या उत्साहावरही पावसाने पाणी फेरले. जिल्ह्यात लांजा, राजापूरसह रत्नागिरीतही रविवारी सायंकाळी वादळासह पाऊस आला. यावेळी विजांचा कडकडाटदेखील झाला. खबरदारी म्हणून महावितरणने विद्युत पुरवठा खंडित केला होता. यामुळे रत्नागिरीवासीयांची रविवारची सायंकाळ अंधारमय झाली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 07-10-2024