वंचित बहुजन आघाडी लांजा तालुका अध्यक्षपदी मोहन धनावडे यांची निवड

लांजा : वंचित बहुजन आघाडीच्या लांजा तालुका अध्यक्षपदी बेनिखुर्द येथील मोहन आप्पा धनावडे यांची तर महासचिवपदी दीपक पवार यांची निवड करण्यात आली.

वंचित बहुजन आघाडीच्या लांजा तालुका कार्यकारिणीची व कार्यकर्ते यांची सभा लांजा शहरातील कुलकर्णी-काळे छत्रालय येथे झाली. या सभेला पक्षाचे तालुक्यातील पदाधिकरी उपस्थित होते. मागील कामकाजाचा आढावा घेऊन आगामी निवडणूक लक्षात घेत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या दृष्टीने सभेमध्ये चर्चा करण्यात आली. तालुका महासचिव पदी दीपक पवार (जावडे), राकेश कांबळे (कणगवली) यांची निवड करण्यात आली. तालुका अध्यक्षपदी धनावडे यांची निवड झाल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. पदाला योग्य न्याय देऊन पक्ष बळकटीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मोहन धनावडे यांनी यावेळी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 PM 07/Oct/2024