‘वंदे भारत’ च्या उन्हाळी सुट्टीतील फेऱ्यांचे आरक्षण फुल्ल

खेड : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या आतिशान अन् सुपरफास्ट वंदे भारत एक्सप्रेसच्या पसंतीचा आलेख दिवसागणिक उंचावत आहे. मात्र उन्हाळी सुट्टीत धावणाऱ्या फेऱ्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाल्याने काही चाकरमान्यांची वेगवान प्रवासाची संधी पुन्हा हुकली आहे. २० मेपर्यंतचे प्रवाशी प्रतीक्षा यादीवर आहेत. यामुळे चाकरमान्यांच्या पदरी निराशाच पडल्याने उन्हाळी सुट्टी हंगामात धावणाऱ्या उन्हाळी स्पेशलचा आधार घ्यावा लागणार आहे.

कोकण मार्गावर धावणान्या २२२२९/२२२३० क्रमांकाच्या सीएसएमटी मुंबई-मडगाव सुपरफास्ट वंदे भारत एक्सप्रेसच्या वेगवान प्रवासाची साऱ्यांनाच भुरळ पडली आहे. मात्र प्रत्येक सणांमध्ये वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास करण्याचे नियोजन करणाऱ्या चाकरमान्यांच्या हाती प्रतीक्षा यादीच पडते. शिमगोत्सवातही हीच परिस्थिती कायम राहिल्याने गावी येण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवासाचे नियोजन करणाऱ्या चाकरमान्यांच्या आशेवर पाणी फेरले होते. गेल्या मडगाव व मडगाव-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेसमधून तब्बल ५० हजार ७३९ प्रवाशांनी सफर करत नव्या विक्रमाची नोंद केली होती.

वंदे भारत एक्सप्रेसच्या सर्वच फेऱ्यांना मिळत असलेल्या भरभरून प्रतिसादामुळेच एक्सप्रेस १६ किंवा २० डब्यांची चालवावी, असा आग्रही रेल्वे प्रवाशी संघटनांसह कोकण विकास समिती, अखंड कोकण प्रवाशी सेवा संघटनांकडून रेल्वे बोर्डासह केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे परण्यात आला आहे. मात्र अद्यापही सकारात्मक प्रतिसाद देण्याऐवजी आधुनिक सुविधांनी परिपूर्ण असलेली वंदे भारत एक्स्प्रेस मंगळूरपर्यंत चालवण्याचा घाट सुरू आहे. यास महाराष्ट्रातील प्रवासी संघटनांनी ठाम विरोध दर्शवला आहे.

वंदे भारत एक्सप्रेसच्या फेऱ्यांचे फुल्ल झालेल्या आरक्षणामुळे चाकरमान्यांना मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या उन्हाळी स्पेशलच्या फेन्यांचाच पर्याय उरला आहे. उन्हाळी स्पेशल गाड्यांचे २४ मार्चपासून आरक्षण खुले होताच यातील फेऱ्याचे आरक्षणही हाऊसफुल्ल झाल्याने चाकरमान्यांच्या हाती प्रतीक्षा यादीवरील तिकिटे पडती आहेत. यामुळे चाकरमान्यांच्या नजरा आता ज्यादा उन्हाळी स्पेशल गाड्यांकडे खिळल्या आहेत, मध्य रेल्वे प्रशासन ज्यादा उन्हाळी स्पेशल गाडया सोडून चाकरमान्यांना दिलासा देते की, रेल्वे गाड्यांना अतिरिक्त डबे जोडून बोळवण करते, हाच औत्सुक्याचा विषय बनला आहे.

एक्सप्रेसला २० डब्यांचा रेक देण्याची आवश्यकता
वंदे भारत एक्स्प्रेसच्या फेयांची लोकप्रियता पाहता या गाडीला २० डब्यांचा रेक देण्याची आवश्यकता आहे. मुंबई-महगाव आणि मंगळूर-महगाय वंदे भारत एक्सप्रेस एकत्रिकरणाला महाराष्ट्रातील सर्वच प्रवासी संघटना विरोध करत आहेत. मंगळूर-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला प्रवासी मिळत नसतील, तर त्याचा फटका महाराष्ट्र आणि गोव्याच्या सेवेला बसता कामा नये मंगळूर-मुंबई स्वतंत्र वंदे भारत एक्सप्रेस सुरू करून तिला आताच्या वंदे भारतला नसलेले सावंतवाडी, वैभववाडी, चिपळूण, माणगाव, कुडाळ हे थांबे देण्यात यावेत. अक्षय म्हापदी रेल्वे अभ्यासक कळया-ठाणे,

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:10 PM 01/Apr/2025