तब्येतीची किरकोळ तक्रार ठरली जीवघेणी; ४३ वर्षीय इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी, दि. ०४ एप्रिल २०२५: रत्नागिरी तालुक्यातील नाखरे, भगवतीवाडी येथील रहिवासी संतोष यशवंत हरमले (वय ४३ वर्षे) यांचे सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथे उपचारादरम्यान निधन झाले. ही घटना दि. ०२ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १५.०५ वाजण्याच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी पुर्णगड पोलिस ठाण्यात आम्रु. क्रमांक ०५/२०२५ अंतर्गत बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.

संतोष हरमले हे आपल्या घरी असताना त्यांना अचानक चक्कर आल्यासारखे वाटू लागले. त्यानंतर त्यांना उलट्या आणि जुलाब सुरू झाले. या त्रासामुळे त्यांना तातडीने पावस येथील डॉ. तेडुलकर यांच्याकडे औषधोपचारासाठी नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर ते घरी परतले, परंतु काही वेळातच त्यांना पुन्हा उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. यावेळी त्यांना श्वास घेण्यासही त्रास होऊ लागल्याने कुटुंबीयांनी त्यांना पावस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तिथे प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात येताच त्यांना अॅम्ब्युलन्सने सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथे हलवण्यात आले.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये संतोष हरमले यांना आय.सी.यु. विभागात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले, परंतु सर्व प्रयत्नांना अपयश आले आणि उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ही घटना दि. ०२ एप्रिल रोजी घडली असून, याची नोंद दि. ०३ एप्रिल २०२५ रोजी पहाटे ००.३३ वाजता पुर्णगड पोलिस ठाण्यात करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 04-04-2025