राजापुरातील १० वकिलांची नोटरी पदी निवड

रत्नागिरी : राजापुर तालुक्यातील दहा वकिलांची भारत सरकारतर्फे नोटरी पदासाठी निवड करण्यात आली आहे.

ॲड. चंद्रशेखर माधव अभ्यंकर, ॲड. पराग विजय मोदी, ॲड . प्रशांत पाध्ये, ॲड. के. सुशांत पवार, ॲड. तेजस्विनी अनिल राणे, ॲड. दिलनवाज वस्ता, ॲड. रोझीना खोपेकर, ॲड. अविनाश कुवेसकर, ॲड. सुनील मेस्त्री आणि ॲड. एकनाथ मोंडे या दहा वकिलांना आता नोटरी म्हणून मान्यता मिळाली आहे.

ही निवड करताना भारत सरकार नोटरी कायद्याअंतर्गत कागदपत्रांची छाननी करून आणि परीक्षा घेऊन त्यानंतर त्यांना नोटरी व्यवसाय प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. त्यामुळे राजापूर तालुकावासीयांची सोय झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 03-04-2025