Team India Schedule 2025: बीसीसीआयने जाहीर केले टीम इंडियाचे वेळापत्रक; पाहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर..

Team India Schedule 2025: बीसीसीआयने टीम इंडियाच्या पुरुष संघाच्या (Team India) वेळापत्रकाची घोषणा केली असून, वर्षाच्या शेवटी वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका हे दोन संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत.

ऑक्टोबर महिन्यात वेस्ट इंडिज भारत दौऱ्यावर येणार असून यावेळी 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. तर नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका भारत दौऱ्यावर येईल. दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामने खेळले जातील.

भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेतील पहिला सामना 2 ऑक्टोबरपासून खेळला जाईल. तर दुसरा सामना 10 ऑक्टोबरपासून सुरू होईल. यानंतर, दक्षिण आफ्रिकेसोबत कसोटी मालिका 14 नोव्हेंबरपासून सुरू होईल. एकदिवसीय मालिका 30 नोव्हेंबरपासून सुरू होईल. तर टी-20 मालिका 9 डिसेंबरपासून सुरू होईल.

भारतीय संघाचे 2025 चे वेळापत्रक- (Indian Cricket Team Home Schedule 2025)

वेस्ट इंडिजचा भारत दौरा –

पहिली कसोटी – २ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर, अहमदाबाद सकाळी ९:३० वाजता
दुसरी कसोटी: १० ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर, कोलकाता सकाळी ९:३० वाजता

दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा –

पहिली कसोटी: १४-१८ नोव्हेंबर: सकाळी ९:३० वाजता, नवी दिल्ली ((सकाळी ९:३० भारतीय वेळेनुसार))
दुसरी कसोटी: २२-२६ नोव्हेंबर, गुवाहाटी (सकाळी ९:३० भारतीय वेळेनुसार)

पहिला एकदिवसीय सामना: ३० नोव्हेंबर, रांची, दुपारी १.३० वाजता
दुसरा एकदिवसीय सामना – ३ डिसेंबर – रायपूरमध्ये दुपारी १:३० वाजता
तिसरा एकदिवसीय सामना: ६ डिसेंबर – विझागमध्ये दुपारी १:३० वाजता

पहिला टी२० – ९ डिसेंबर – संध्याकाळी ७:०० वाजता, कटक
दुसरा टी२० – ११ डिसेंबर – संध्याकाळी ७:०० वाजता, चंदीगड
तिसरा टी२० – १४ डिसेंबर – संध्याकाळी ७:०० वाजता, धर्मशाला
चौथा टी२० – १७ डिसेंबर – संध्याकाळी ७:०० वाजता, लखनौ
पाचवा टी२० – १९ डिसेंबर – संध्याकाळी ७:०० वाजता, अहमदाबाद

आयपीएल संपताच भारतीय संघ इंग्लंडचा दौरा करणार-

सध्या आयपीएलचा हंगाम सुरु आहे. आयपीएल संपताच भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडचा दौरा करणार आहे. दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. जी 20 जूनपासून सुरू होईल. कसोटी मालिकेतील शेवटचा सामना 31 जुलै रोजी खेळला जाईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 03-04-2025