Trump Tariffs : ट्रम्प टॅरिफ निर्णयामुळं भारतावर नेमका काय होणार परिणाम? सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री?

अमेरिकेच्या 26 टक्के शुल्कामुळे अनेक भारतीय कंपन्या आणि क्षेत्रांना व्यावसायिक नुकसान सहन करावे लागू शकते, ज्यामध्ये कृषी, रसायन, औषधनिर्माण, वैद्यकीय उपकरण निर्मिती कंपन्या आणि वाहन उद्योगांचा समावेश आहे.

भारताकडून 26 टक्के दराने आयात शुल्क आकारण्याची घोषणा करण्यात आली असून याचा परिणाम आता देशाच्या व्यापार आणि शेअर बाजारावर दिसून येईल.

अमेरिकेत आता परदेशात उत्पादित होणाऱ्या वाहनांवर 25 टक्के आयात शुल्क आकारले जाणार आहे. याआधी अमेरिका फक्त 2.4 टक्के टॅरिफ आकारायचा तर, भारत 60 टक्के, व्हिएतनाम 70 टक्के आणि इतर देश त्याहूनही जास्त दर आकारत होते.

औषधे आणि वैद्यकीय उपकरणांच्या आयातीवरही अतिरिक्त शुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे. चीन, भारत आणि युरोपीय देशांमधून येणाऱ्या औषधांवर 10-20 टक्के दर लागू केला जाऊ शकतो.

तसेच अमेरिका इतर देशांमधून आयात केलेल्या स्मार्टफोन, लॅपटॉप, सेमीकंडक्टर आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर 12-15 टक्क्यांपर्यंत शुल्क लादेल. विशेषतः चीन, दक्षिण कोरिया आणि तैवान येथून येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर जास्त शुल्क आकारले जाईल.

चीन, तैवान आणि दक्षिण कोरिया अमेरिकेत ॲपल आयफोनपासून ते टेलिव्हिजन सेटपर्यंत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने निर्यात करतात. म्हणजे आता या देशांवर शुल्क लागू झाल्यानंतर यामुळे आयफोन आणि इतर मोबाईल उपकरणे महाग होऊ शकतात.

अमेरिका स्टील आणि ॲल्युमिनियम उत्पादनांवर 18-22 टक्क्यांपर्यंत शुल्क लादणार आहे, ज्यामुळे भारतीय आणि चिनी कंपन्यांना अमेरिकन बाजारात व्यवसाय करणे महागात पडू शकते.

अमेरिका कापड आणि तयार कपड्यांच्या आयातीवरील शुल्क वाढवण्याची योजना आखत आहे. त्यामुळे चीन आणि भारतातील कापड उद्योगाला मोठा फटका बसू शकतो.

भारत अमेरिकेला 11.88 अब्ज डॉलर्सचे सोने, चांदी आणि हिरे निर्यात करतो पण, यावर आता 13.32 टक्के दर आकारला जाऊ शकतो. त्यामुळे अमेरिकेत भारतीय सोने आणि चांदीचे दागिने महाग होतील.

टॅरिफचा भारतावर संमिश्र परिणाम होईल, असं तज्ज्ञांचे मत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:47 03-04-2025