Gold Silver Price 3 April: आज सराफा बाजारात जीएसटीशिवायचं २४ कॅरेट सोनं २०९ रुपयांनी महागलं आहे. सोनं आज ९१,२०५ रुपये प्रति ग्रॅमच्या नव्या उच्चांकी पातळीवर उघडलं. तर चांदीत मात्र २२३६ रुपयांची घसरण नोंदवण्यात आली.
आज चांदी ९७,३०० रुपये प्रति किलोग्रॅमवर उघडली. या दरामध्ये जीएसटीचा समावेश नाही. ३ टक्के जीएसटी जोडल्यास आज सोन्याचा भाव ९३,९४१ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा दर १००२१९ रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (आयबीजेए) सराफा बाजाराचे हे दर जाहीर केले आहेत. यामध्ये जीएसटीचा समावेश नाही. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा असू शकतो. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास, तर दुसऱ्याला सायंकाळी ५ च्या सुमारास दर जारी केले जातात.
१४ ते २३ कॅरेट सोन्याचे दर काय?
आयबीजेएच्या दरानुसार आज २३ कॅरेट सोन्याचा भाव २०८ रुपयांनी वाढून ९०,८४० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर २२ कॅरेट सोन्याचा सरासरी स्पॉट भाव दुपारी १ वाजण्याच्या सुमारास १९२ रुपयांनी वाढून ८३,५४४ रुपये झाला. १० कॅरेट सोन्याचा भाव ६६,९६० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव १२२ रुपयांनी वाढून ५३३५५ रुपये झाला आहे. या वर्षी आतापर्यंत सोन्याच्या दरात १५,४६५ रुपये आणि चांदीच्या दरात ११,२८३ रुपयांची वाढ झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:58 03-04-2025
