अमेरिकेचे टॅरिफ भारताला उद्ध्वस्त करेल : राहुल गांधी

नवी दिल्ली : अमेरिकेच्या नव्या टॅरिफवरुन आज काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली. राहुल गांधी यांनी चिनी कब्जाचा मुद्दा देखील उपस्थित केला.

‘अमेरिकेने भारतावर शुल्क लादले आहे. याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होईल’, असं सांगत राहुल गांधी यांनी टॅरिफवरुन सरकारला प्रश्न उपस्थित केले.

काही दिवसापूर्वी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी चिनी राजदूतासोबत केक कापल्याचा फोटो समोर आला होता. यावरुन राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

राहुल गांधी म्हणाले, “चीनने ४००० किमी अंतर कापले, २० सैनिक शहीद झाले, पण परराष्ट्र सचिव चिनी राजदूतासोबत केक कापत आहेत. पंतप्रधान आणि राष्ट्रपती चीनला पत्र लिहित आहेत. हे सरकार नव्हे तर चिनी राजदूत सांगत आहेत. विक्रम मिस्री आपल्या सैनिकांच्या शहीदत्वाचा केक कापण्यासाठी चिनी दूतावासात गेले होते का?, असा सवालही त्यांनी केला.

दुसरीकडे, अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर देत म्हणाले की, अक्साई चीन कोणाच्या सरकारमध्ये चीनमध्ये गेला. मग हिंदी आणि चिनी लोक म्हणत राहिले भाऊ आणि तुमच्या पाठीत वार झाला. डोकलाम घटनेदरम्यान चिनी अधिकाऱ्यांसोबत कोण चिनी सूप पीत होते, असं प्रत्युत्तर ठाकूर यांनी दिले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लागू केला

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आज रेसिप्रोकल टॅरिफबाबत मोठी घोषणा करत जगभरातील देशांना जबर धक्का दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आजच्या दिवसाचं नामकरण लिबरेशन डे असं करतानाचा विविध देशांकडून आकारण्यात येणाऱ्या टॅरिफची घोषणा केली आहे. त्यामध्ये ट्रम्प यांनी भारतालाही जोरदार धक्का दिला आहे. ट्रम्प यांनी भारतावर २६ टक्के टॅरिफ आकारण्याची घोषणा केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:11 03-04-2025