देवरुख महाविद्यालयात बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी योजनांचे मार्गदर्शन

देवरुख : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात बांधकाम कामगारांसाठी असलेल्या ३२ कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ, देवरुखचे व्यवस्थापक श्री. शैलेश पवार यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी मंडळाच्या वेबसाईटवरील माहितीचे सादरीकरण करून योजनांची माहिती दिली. तसेच, ऑनलाईन अर्ज कसा भरावा आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, याबद्दल मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहाय्य योजना, आर्थिक सहाय्य योजना, सामाजिक सुरक्षा योजना, आरोग्य विषयक योजना या योजनांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच, या योजनांसाठी आवश्यक पात्रता आणि कागदपत्रे यांची माहिती देण्यात आली.

प्रा. संदीप मुळ्ये यांनी विद्यार्थ्यांना आपल्या पालकांचे आणि गावातील बांधकाम कामगारांची नोंदणी करण्याचे आवाहन केल या कार्यक्रमाला प्रा. सुवर्णा साळवी, प्रा. संदीप मुळ्ये, प्रा. अभिनय पातेरे, प्रा. प्रवीण जोशी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्नाली झेपले आणि प्रास्ताविक प्रा. शिवराज कांबळे यांनी केले.

प्रा. विजय मुंडेकर, प्रा. संचिता चाळके, सहाय्यक महेंद्र मेचकर आणि अमोल वेलवणकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले. संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर आणि उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:10 PM 03/Apr/2025