रत्नागिरी : जिल्ह्यातील आजी/माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच १०० दिवसांच्या कृती आराखडा योजनेच्या अनुषंगाने तालुका पातळीवर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गटविकास अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत सोमवारी, दि. ७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता खेड येथे बैठक होणार आहे.
ही बैठक खेडच्या तहसीलदार कार्यालयात होणार असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी कळविले आहे. ज्या माजी सैनिकांना अडीअडचणी असतील, त्यांनी आपला अर्ज व संबंधित कागदपत्रांसह या बैठकीस विहित वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 04-04-2025
