देशभरात पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये 2000 रुपयांप्रमाणं रक्कम दिले जातात. 24 फेब्रुवारीला पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. पीएम किसान सन्मान निधीच्या नियमानुसार दोन हप्त्यांमधील अंतर चार महिन्यांचं असतं. फेब्रुवारीत 19 व्या हप्त्याची रक्कम मिळाल्यानंतर 20 वा हप्ता जूनमध्ये मिळू शकतो.
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळवायचे असल्यास शेतकऱ्यांना 30 एप्रिलपूर्वी फार्मर आयडी बनवावं लागेल. पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे त्यांना पाठवले जाणार आहेतह, हे सरकारनं स्पष्ट कंल आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलं नाही तर त्यांना पीएम किसानचे पैसे मिळू शकत नाहीत.
फार्मर आयडी काढण्यासाठी तुम्ही जवळच्या सीएससी केंद्र किंवा कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क करु शकता. शेतकऱ्यांची ओळख निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारनं अॅग्रीस्टॅक प्रोजेक्ट अंतर्गत फार्मर आयडी म्हणजेच शेतकरी ओळखपत्राची सुरुवात केली आहे. फार्मर आयडी शेतकऱ्यांना जवळच्या सीएससी केंद्रावरुन काढता येतील.
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना मेसेज पाठवून 30 एप्रिलपूर्वी फार्मर आयडी काढून घेण्यास सांगण्यात आलं आहे. त्यामुळं शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी काढून घेणं आवश्यक आहे. शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी काढून घेणं आवश्यक आहे. त्यासाठी कृषी विभाग, महसूल विभाग आणि सीएससी केंद्रावरुन फार्मर आयडी संदर्भात माहिती मिळू शकते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:20 11-04-2025
