काजू उत्पन्न घटले तरी दरामुळे बागायतदार सावरले..

राजापूर : हगायाच्या सुरुवातीपासून असलेल्या प्रतिकूल वातावरणाचा काजू उत्पादनावर परिणाम झाला. त्यामुळे उत्पन्नही घटले. काजू उत्पादनासाठी केलेला खर्च आणि संभाव्य उत्पन्न याचा मेळ कसा बसवायचा, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. सद्यःस्थितीमध्ये काजूचा दर सरासरी १५५ ते १६० रुपये आहे. काजूच्या आयातीचे प्रमाण घटल्याने काजूचा दर स्थिर राहिला आहे. यामुळे काजू बागायतदारांच्या चेहऱ्यावर खुशीचे हास्य फुलले आहे.

पांढरे सोने म्हणून ओळखल्या जात असलेल्या काजूला हापूस आंब्याप्रमाणे पर्यावरणामध्ये होणाऱ्या प्रतिकूल बदलांनी आणि विविध कीडरोग समस्यांनी ग्रासले आहे. यावर्षीही काजूचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे खर्च आणि उत्पत्राचा ताळमेळ नेमका कसा बसवायचा या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे. दरवर्षीच्या तुलनेमध्ये काजूला चांगला आणि स्थिर दर मिळताना दिसत आहे. काजू हंगामाच्या सुरुवातीला असलेल्या दरामध्ये वाढ होऊन संध्या हा काजू वर १५५ ते १६० रुपये प्रतिकिलो दरावर स्थिर झाला आहे.

त्यामुळे काजूचे उत्पादन घसरले असले तरी, या स्थिर आणि समाधान‌कारक राहिलेल्या दरामुळे काजू बागायतदार, शेतकरी यांना दिलासा मिळाला आहे. दरवर्षी परदेशातून मोठ्या प्रमाणात काजू बी भारतामध्ये आयात केली जाते. आयात होणाऱ्या काजू बीचा स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या दरावर प्रभाव राहतो. त्यातून स्थानिक काजूचा प्रतिकिलो दर घटून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा फटका बसतो. मात्र यावर्षी काजू बी आयात कमी झाल्याने काजू बीचा समाधानकारक आणि स्थिर राहिल्याचे व्यापारी आणि शेतकरी यांच्याकडून सांगितले जात आहे.

प्रतिकूल वातावरणामुळे काजूचे यावर्षी काजू हंगामासाठी केलेला खर्च आणि उत्पन्नाचा मेळ बसवण्याची चिंता असताना काजू बीला समाधानकारक दर मिळत असल्याने दिलासा मिळाला आहे. – नामदेव सावंत, बागायतदार

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 PM 16/Apr/2025